गाव विकासासाठी दुध उत्पादनावर भर : घावनळे मयूर दूध संस्थेचा उपक्रम
गावात रोज केवळ पाच लिटर दूध तयार झाले, तरी एका युवकाला रोजगार मिळतो. हा रोज पैसे देणारा पूरक व्यवसाय आता गावात मुख्य उद्योग बनू लागला आहे. गावातील लोकांनी अशा संस्था स्थापन कराव्यात म्हणून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केली जाते. कर्जे, प्रशिक्षण, सुधारित जातीची दुधाळ जनावरे, चारा पिके, कृत्रिम गर्भधारणा ते संगणक शिक्षणापर्यंत सर्व प्रकारची मदत भगीरथ पुरवते. उद्दिष्ट पाच वर्षांत गावातून १००० लिटर दुधाचे उत्पादन साध्य करणे आहे.
रोजगार निर्मिती गप्पांनी होत नाही; त्यासाठी लोकचळवळ उभी करावी लागते, ज्यातून गावाचा सर्वांगीण विकास घडतो.
या प्रयत्नाचा एक उत्तम उदाहरण म्हणजे घावनळे मयूर दूध संस्था. संस्थेने अलीकडेच मंदिरात दूध अभिषेक केला आणि मयूर दूध संस्थेचे दूध संकलन केंद्र सुद्धा सुरू केले आहे. सध्या संस्थेचे ६०० लिटर दूध संकलन आहे आणि ते दुप्पट करण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली.
या विकास प्रक्रियेसाठी पुढील गोष्टींवर भर दिला जात आहे :
• मुरा जातीच्या म्हशींची खरेदी
• सुधारित गोठ्यांचे बांधकाम
• सिंचनासाठी विहिरी आणि सोलर पंप
• चारा पिकांची लागवड
या सर्वांसाठी आवश्यक कर्जपुरवठा संस्थेच्या सहकार्याने करण्यात येत आहे.
विकास हा एकट्याचा प्रयत्न नसून एक संघटनात्मक टीम वर्क आहे.
गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सहभागातूनच खरा आणि शाश्वत विकास साधता येईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.