भगीरथ लाडकी बहीण योजना - महिलांचा स्वावलंबनाचा प्रवास

    
|

भगीरथ लाडकी बहीण योजना - महिलांचा स्वावलंबनाचा प्रवास

सरकार कोणतीही योजना राबवते तेव्हा तिचे काही फायदे तर काही मर्यादा असतात. पण जर या योजना योग्य प्रकारे समजून घेऊन त्यांचा उपयोग केला, तर समाजात खरा बदल घडवून आणता येतो. महिलांच्या स्वावलंबनासाठी भगीरथ संस्थेने याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

रोजगार साधनांचा पुरवठा

भगीरथ संस्थेने प्राज CSR च्या माध्यमातून महिलांना घरगुती उद्योग आणि व्यवसायासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिली.

घर-घंटी
शिवणयंत्रे
कोंबडी घुड


ladki Bahin

या साधनांच्या खरेदीसाठी संस्थेकडून प्रती महिलेला अनुक्रमे 3,000, 4,000 आणि 5,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले. हे अनुदान साधारणतः त्या वस्तूच्या किंमतीच्या 25% इतके होते. उर्वरित रक्कम महिलांनी स्वतःकडून उभी केली. विशेषतः काही महिलांनी लाडकी बहीण योजना वापरून निधी उभारला.


50 महिलांना थेट लाभ
या उपक्रमातून एकूण 50 महिलांना थेट लाभ झाला. हाताशी रोजगार साधने आली आणि त्यातून उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. एकदा पैसे गुंतवले की त्यातून नवा रोजगार उभा राहतो आणि उत्पन्नाची साखळी सुरू होते.


स्वावलंबनाची वाटचाल
प्रारंभी आधाराची गरज असते, पण आयुष्यभर आधारावर जगता येत नाही. या महिलांनी "आता स्वतःच्या पायावर उभे राहायचे" हा ठाम निश्चय केला आहे. काठीचा आधार घेत पुढे चालायला सुरुवात केली आणि आता हळूहळू स्वावलंबनाच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.


बदलाची बीजे
या छोट्याशा उपक्रमाने ग्रामीण भागातील महिलांना नवी दिशा दिली. त्यांनी रोजगार मिळवला, उपजीविकेची साधने उभी केली आणि आत्मविश्वासाने भविष्याकडे पाहायला सुरुवात केली.


भगीरथ संस्थेला विश्वास आहे की अशा प्रकारचे उपक्रम समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतील आणि स्वावलंबनाचा मार्ग प्रशस्त करतील.